वन विभागाची परवानगी न घेता झाड तोडणार असाल, तर सावधान! तुमचा खिसा रिकामा होऊ शकतो. कारण यापुढे जर कुणी विना परवानगी झाड तोडले, तर त्याला एक नाही दोन नाही, तब्बल ५० हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे.
हे वाचा👉शरद पवारांची राष्ट्रवादी महाराष्ट्र पालथा घालणार : काढणार शिव स्वराज्य यात्रा
राज्य मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक झाली. तीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी हा दंडाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्यात येऊन दंड ५० हजार रुपये करण्यात येणार आहे. आधी हा दंड एक हजार रुपये होता.
हे वाचा👉कोण आहेत बांगलादेश सोडून पळालेल्या शेख हसीना?
वृक्षतोड ही दिवसेंदिवस मोठी समस्या बनत चालली आहे. तिला आळा घालणे गरजेचे आहे. त्यामुळे झाड तोडल्यावर करण्यात येणाऱ्या दंडात मोठी वाढ करण्यात येणार आहे. आता दंडाबरोबरच झाड तोडण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे व लाकूड वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी वाहनेही जप्त करण्याची तरतूद करण्यात येणार आहे.
हे वाचा👉बांग्लादेशमधील अस्थिरतेचा कांद्याच्या भावावर परिणाम होणार?