बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना नुकतेच देश सोडून पळून जावे लागले. एके काळी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना आज मात्र त्यांना देश सोडावा लागला आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. राजिनामा दिल्यानंतर त्या हेलिकॉप्टरद्वारे भारतात दाखल झाल्या.
शेख हसीना या बांगलादेशाच्या पंतप्रधान असून सन २००९ पासून त्या या पदावर आरूढ आहेत. बांगलादेशचे स्वातंत्र्यसैनिक व पहिले पंतप्रधान शेख मुजिबूर रहेमान यांच्या त्या कन्या आहेत. १९८१ सालापासून त्या बांगलादेश अवामी लीग या पक्षाच्या अध्यक्षही आहेत.
शेख हसीना यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. हे आरक्षण सुमारे ३० टक्क्यांपर्यंत आहे. याच निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन उभं केलं. हे आंदोलन अधिकाधिक तीव्र झाल्याने हसीना यांना देश सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.