महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे Maharashtra Navnirman Sena अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्यावर मराठा आंदोलक चांगलेच संतापलेले सध्या दिसत आहे. राज ठाकरे नुकतेच बिड Beed जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, यावेळी मराठा आरक्षणातील Maratha Reservation आंदोलकांनी त्यांची गाडी हॉटेलमध्ये आल्या आल्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या व जोरदार घोषणाबाजी केली.
राज ठाकरे इतरांच्या सुपाऱ्या घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. यात मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांची कोंडी होताना दिसत आहे. यावर राज ठाकरेंनी मात्र यात राजकारण होत असून तरुणांची माथी भडकवण्याचे काम उद्धव ठाकरे Udhhav Thakrey व शरद पवार Sharad Pawar करीत असल्याचा आरोप केला आहे. अजित पवार Ajit Pawar मात्र जातीचे राजकारण करीत नाही, अशी क्लीन चीट त्यांनी दिली आहे.
हे वाचा👉कोण आहेत बांगलादेश सोडून पळालेल्या शेख हसीना?
महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. या वक्तव्याचे महाराष्ट्रभर चांगलेच पडसाद उमटले आहे. सध्या राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे वातावरण निर्माण झालेले असल्याच्या पार्श्वभूमिवर हे वक्तव्य केल्याने राज ठाकरे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत, असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण झाला आहे. त्यामुळेच बीडमध्ये त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकण्यात आल्या.
हे वाचा👉खबरदार! झाड तोडले तर होईल खिसा रिकामा ; होणार मोठा दंड
ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झालेला असतानाही त्यांनी थेट जरांगे यांच्या अंगावर जाणे टाळले. जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे व शरद पवार यांनीच तरुणांना भडकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र त्यांच्याकडे प्रस्थापित असतील, तर माझ्याकडे विस्थानिक असल्याचे त्यांनी म्हटले. ठाकरे व पवार यांना राज्यात एकही सभा घेऊ देणार नाही, असा राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे.
हे वाचा👉शरद पवारांची राष्ट्रवादी महाराष्ट्र पालथा घालणार : काढणार शिव स्वराज्य यात्रा
अजित पवारांचे मात्र राज ठाकरे यांनी कौतूक केले आहे. अजित पवार हे शरद पवार यांच्या सोबत असतानाही आणि आताही ते कधीच जातीचे राजकारण करीत नाही. आधीही त्यांनी कधी जातीचे राजकारण केले नाही, त्यांनी कधीही जाती-पातीवर वक्तव्य केले नसल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.