बांग्लादेशमधील अस्थिरतेचा कांद्याच्या भावावर परिणाम होणार?

बांग्लादेशमध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. देशभर आंदोलनाचा भडका उडालेला असून. देशाच्या अनेक भागांमध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील बाजारपेठेवर झाला असून बहुतांशी बाजारपेठा बंद आहेत. याचा परिणाम भारतावरही झाला असून त्यामुळे कांद्याचे भावही प्रभावित होऊ शकतात. सध्या कांद्याची कमी आवक असल्यामुळे भाव स्थिर असले, तरी लवकर समस्या सुटली नाही, तर मात्र भावावर परिणाम होऊ शकतो. 

हे वाचा👉बांगलादेशात मुस्लिम धर्मगुरू करताहेत मंदिरांचे रक्षण

बांग्लादेशमधील राजकीय अस्थिर परिस्थितीचा राज्यातील व्यापारावर चांगलाच परिणाम झाला आहे. राज्यातून बांग्लादेशमध्ये पाठविण्यात आलेली कांद्याची वाहने भारत - बांग्लादेशच्या सिमेवरच अडकली आहेत. या ट्रकची संख्या ७० ते ८० अस्लयाचे समजते. केंद्राने नुकतीच कांदा बांग्लादेशला निर्यात करण्याची परवानगी दिली होती.  

हे वाचा👉 कोण आहेत बांगलादेश सोडून पळालेल्या शेख हसीना?

यासंदर्भात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. त्यांनी म्हटलं, की कांद्याचे ट्रक सीमा भागातून पुढे जाण सध्या अवघड आहे. यासाठी काही दिवस लागू शकतात. या प्रश्नात केंद्राने हस्तक्षेप करावा, यासाठी बांग्लादेशमधील सूत्रधारांशी संपर्क साधावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

भारतातून अनेक गोष्टींची निर्यात बांग्लादेशमध्ये होते; परंतु त्यातील कांदा नाशवंत असल्यामुळे कांद्याचे नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांचं नुकसान अधिक होणार आहे, आणि साहजिकच त्याचा परिणाम कांद्याच्या बाजारभावावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारीही चिंतेत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने