बांगलादेशात मुस्लिम धर्मगुरू करताहेत मंदिरांचे रक्षण

बांगलादेशमध्ये सध्या अराजकतेचे वातावरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधानपदी असलेल्या शेख असीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. देशभर विदद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत काही मुस्लिम धर्मगुरू आणि काही मुस्लिम नागरिक मंदिर आणि इतर धर्माच्या नागरिकांचे संरक्षण करत आहेत. यासाठी काही ठिकाणी मानवी साखळी बनविण्यात आली आहे. 

 हे वाचा👉 कोण आहेत बांगलादेश सोडून पळालेल्या शेख हसीना?

बांगलादेशमध्ये अनेक दिवसांपासून विदद्यार्थ्यांचे प्रदर्शने सुरू आहेत. हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत गेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हिंसाचार सुरू आहे. अशा अस्थिर वातावरणात बांग्लाादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात आल्या आहेत. त्याआधी त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. या अस्थिर राजकीय परिस्थितीचा कोणी गैरफायदा घेऊ नये, यासाठी अनेक विद्यार्थी काळजी घेत आहेत. 

बांगलादेशातील मुस्लिम धर्मगुरू मंदिरांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत. याव्यतीरीक्त ज्या ठिकाणी हिंदू बहुसंख्येने राहातात, तेथे सैन्याला तैनात करण्यात आले आहे. जवान हिंदुंचे रक्षण करीत आहेत. या राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात कुणालाही लूट माजविण्याची संधी मिळू नये, अशी भूमिका विद्यार्थी संघटनेने घेतलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अंतरिम सरकार स्थापन करण्याची मागणी केली होती. 

अनेक दिवसांपासून विद्यार्थी देशभर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनादरम्यान अनेक लोक मारले गेले आहेत. त्यात अनेक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. विद्यार्थी नेता नाहिद इस्लाम याने कुणालाही लूट करण्याची संधी मिळू नये, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी शांततेत रस्त्यावर बसून आंदोलन करावे, असेही आवाहन त्याने केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने